टीम महाराष्ट्र देशा : राजर्षी शाहू महाराज यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापुरातील नागरिक शाहू जन्मस्थळावर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शाहू महाराज यांना अभिवादन केले. तसेच छत्रपती संभाजीराजेंनी केलेल्या मोफत शिक्षणाच्या मागणीचा विचार करु, असं विधान पाटील यांनी केले. यावेळी खासदार संभाजीराजेही उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटील यांनी, खासदार छत्रपती संभाजी महाराजांशी विविध विषयावर चर्चा झाली. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असतं. गरीब विद्यार्थ्यांची मेडीकलची आर्धी फीदेखील सरकार भरतं. शक्य तिथे आपण विद्यार्थ्यांना मदत करतो’ असं विधान केले. तसेच पुढे बोलताना महाराष्ट्रात सध्या १२वीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण आहे. अगदी बसचा पासदेखील दिला जातो.
प्रामुख्याने जिल्हा परिषद, मनपाच्या शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वकाही मोफत असतं. फी नसतेच, गणवेश, पुस्तकं, वह्या दिल्या जातात. ज्यांना बऱ्या शाळांमध्ये जायचं असतं, अशा शाळांमध्ये २५ टक्के जागांची सक्ती केली. त्यामुळे शिक्षणासाठी सरकारचं प्राधान्य आहे. ज्या घटनेमुळे संभाजीराजे बोलले, त्याबाबत आम्ही त्यांच्याशी चर्चा करुन आणखी काय करता येईल हे पाहू” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, छत्रपती संभाजीराजेंनी आरक्षण गेलं खड्ड्यात ! पदवी पर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा अस ट्वीट करत मोफत शिक्षणाची मागणी केली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

