🕒 1 min read
नवी दिल्ली: पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना रसद पोहचविणाऱ्या आणि आयएसआयशी कनेक्शन असलेल्या जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना केंद्र सरकारने जोरदार दणका दिला आहे. पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने मीरवाइज उमर फारूखसह अब्दुल गनी बट्ट, हाशिम कुरैशी, बिलाल लोन आणि शब्बीर शाह या पाच फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. शिवाय त्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी गाड्याही काढून घेतल्या जाणार आहेत.
दरम्यान,पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारत केव्हाही सर्जिकल स्ट्राइक करू शकतो या भीतीने पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील दहशतवाद्यांचे तळ हलवण्यास सुरुवात केली आहे. आमच्या Let’s Talk या आमच्या विशेष कार्यक्रमात याच मुद्द्याबाबत आम्ही पुण्यातील तरुणाई बरोबर संवाद साधला. पाकिस्तानला त्याच्याच भाषेत धडा शिकविण्याची मागणी यावेळी संतप्त तरुणांनी केली आहे.
पहा व्हिडीओ –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

