Share

ओबीसी आरक्षणात ढवळाढवळ न करता मराठा समाजाला आरक्षण द्या; शिवसेनेच्या माजी मंत्र्याची मागणी

Published On: 

अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. अद्यापही सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठासमोर आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. तर, मराठा समाजाने आंदोलने व अनेक ठिकाणी निदर्शने सुरु ठेवले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार गांभीर्याने न्यायालयात बाजू मांडत नसल्याची टीका केली जात आहे.

अशातच, काही नेत्यांच्या विधानांमुळे मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ओबीसी समाजाच्या आरक्षणात ढवळाढवळ न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी मागणी ओबीसी नेते करत आहेत. आता, शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी देखील ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी केली आहे.

‘मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नाही, मात्र ओबीसींचे आरक्षण कमी न करता किंवा ओबीसी आरक्षणात ढवळा ढवळ न करता त्यांना आरक्षण द्यावं,’ अशी मागणी जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वात तेली समाजाचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी तसंच माजी आमदार शिवाजी चोथे यांची देखील उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!