नवी दिल्ली: भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.१८१८ मध्ये ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी ही भारतात जीवनविमा व्यवसाय सुरु करणारी पहिली विमा कंपनी आहे.
गेले अनेक दशके एलआयसी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहे. सध्या १३,३७,०६४ इतके एलआयसी एजंट भारतभर कार्यरत आहेत. स्थापनेपासून गेल्या ६० वर्षात आणि उदारीकरणानंतरही जीवन विम्यात एल आय सी ची मक्तेदारी राहिली आहे. मुख्यतः जीवन विमा सेवा पुरवणाऱ्या एलआयसीने गेल्या काही वर्षांपासून इतर आर्थिक उत्पादने देखील बाजारात आणली आहेत. युलिप, म्युच्युअल फंड, गृहकर्ज इत्यादी सेवा सध्या एलआयसीमार्फत पुरवल्या जातात.
एलआयसीची अशीच एक पॉलिसी तुम्हाला मिळवून देऊ शकते 63 लाख रुपये या पॉलिसीमध्ये केवळ 1302 रुपयांची गुंतवणूक करून 63 लाख रुपये मिळवू शकता. एलआयसीच्या या पॉलिसीचं नाव जीवन उमंग पॉलिसी आहे. या पॉलिसीचा फायदा 3 महिन्यांच्या बाळापासून ते 55 वर्षीय व्यक्तीपर्यंत घेता येऊ शकतो.
या पॉलिसीअंतर्गत एका महिन्याला 1302 रुपये गुंतवणूक केल्यास, वर्षाला 15,624 रुपये होतात. 15,624 रुपये 30 वर्षासाठी ठेवल्यास एकूण गुंतवणूक 4,68,720 रुपये होतील. 31व्या वर्षी वार्षिक 40000 रुपये रिटर्न मिळेल. जर 100 वर्षापर्यंतच्या रिटर्नची गणना केल्यास, 40000 रुपयांवर 70 वर्ष केल्यास, 28 लाख रुपये होतात. या पॉलिसीमध्ये एकूण फायदा 23,41,060 रुपये होईल. त्याशिवाय ही पॉलिसी 100 वर्षापर्यंत कव्हर देते, त्यामुळे व्यक्तीचं वय 101 झाल्यास त्या व्यक्तीला 62.95 लाख रुपये मिळतील.
या पॉलिसीची वैशिष्ट्ये असे की, या योजनेत पॉलिसीधारकाला 100 वर्षांपर्यंत कव्हर मिळतो. मॅच्योरिटी किंवा पॉलिसी होल्डरच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना रक्कम दिली जाते. 90 दिवसांपासून ते 55 वर्षापर्यंतच्या व्यक्ती यात गुंतवणूक करू शकतात. प्रीमियम पेइंग टर्म म्हणजेच पीपीटी 15, 20, 25 आणि 30 वर्षापर्यंत निर्धारित आहे. जीवन विम्याचा 8 टक्के रिटर्न आयुष्यभरासाठी प्रत्येक वर्षी मिळेल तर प्रीमियम संपल्यानंतर किंवा पॉलिसीच्या मुदतीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, प्रीमियमच्या शेवटच्या वर्षापासून ते वयाच्या 99 वर्षांपर्यंतचा वार्षिक लाभ आणि कुटुंबियांना एकरकमी रक्कम देण्याची सुविधा आहे.
या पॉलिसीची प्रीमियम रक्कम 25000 किंवा त्याच्या गुणकांमध्ये 15, 20, 25, 30 वर्षाच्या पर्यायांसह उपलब्ध असेल. यात जीवन विमा संरक्षण आयुष्यभरासाठी आहे. कोणताही वेगळा प्रीमियम देण्याची गरज नाही. या पॉलिसीबाबत अधिक माहितीसाठी https://www.licindia.in/Products/Insurance-Plan/LICs-Jeevan-Umang या लिंकवर क्लिक करा.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केला ‘हा’ मोठा पराक्रम
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने आख्ख गाव गेलं वाहून; भारतीय क्रिकेटर्सनी केली प्रार्थना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

