अबू धाबी : पहिल्या लीगमध्ये पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर धावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने काल सनरायझर्स हैदराबादवर 8 विकेट्सनी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सला हैद्राबादकडून विजयासाठी 135 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, त्यांनी 13 चेंडू शिल्लक असताना 8 गडी राखून सहज विजय मिळवला. दिल्लीची सुरुवात चांगली झाली नव्हती कारण पृथ्वी शॉच्या रूपात पहिला विकेट लवकर गमावला. पण त्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून विजयाचा पाया रचला.
या मॅचमध्ये खेळताना दिल्लीच्या शिखर धवनने पुन्हा एकदा नवा विक्रम केला आहे. शिखर धवनने यावेळी आठ वेळा आयपीएलच्या एका हंगामात ४०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने सलग सहाव्यांदा ही कामगिरी केली. यंदाच्या आयपीएलमध्ये शिखर धवनने ४०० धावांचा टप्पा ओलांडला.
आयपीएलच्या एका हंगामात ४०० किंवा जास्त धावा करण्याचा पराक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. त्याने सर्वाधिक नऊ वेळा ही कामगिरी केली आहे. शिखर धवनने यंदा आठव्यांदा ही कामगिरी केली. डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा आणि विराट कोहली या तिघांनी ही कामगिरी प्रत्येकी सात वेळा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; म्हणाले, ‘कोणत्याही परिस्थितीत…’
- कोरोनाने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार ५० हजार रुपये, केंद्राची माहिती
- शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू केंद्र सरकार पुसणार आहे का? आ. धीरज देशमुखांचा सवाल
- ठरलं ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठे बहुसदस्यीय तर कुठे एक सदस्यीय
- पुण्यात उभं राहणार साखर संग्रहालय; राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

