Share

दहा रुपयांची थाळीचं बजेट कुठून पूर्ण करणार – नारायण राणे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (ता. १२ ) शिवसेनेने त्यांचा जाहीरनामा प्रसिध्द केला. या जाहीरनाम्यात गरिबांसाठी १० रुपयात थाळी देणार, असे आश्वासन देण्यात आले आहे. या अश्वसानावरून नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ” दहा रुपयात सकस जेवणाचं बजेट कुठून पूर्ण करणार. दहा रुपयांची थाळी मातोश्रीवर बनविणार का असा प्रश्न विचारला ?

ते म्हणाले, ” उद्धव ठाकरे वचननामा पूर्ण कुठून करणार याचं बजेट कुठून आणणार? 10 रुपयात थाळी देणार त्यातील नुकसान कोण भरुन देणार? उद्धव ठाकरे सातबारा कोरा करणार असं म्हणतात. त्यांना सातबारा तरी माहित आहे का? अशा शब्दात राणेंनी शिवसेनेवर घणाघात केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाचे तिन्ही उमेदवार निवडून येणार हे नक्की, कणकवलीतून शिवसेनेने उमेदवारचे नावही जनतेला माहित नाही. त्यांना काम करणारे आमदार नितेश राणे माहित आहेत. जनतेला विकास अन् नोकऱ्या पाहिजे त्यामुळे सिंधुदुर्गातील जनता भाजपाच्या पाठिशी ठाम आहे.”

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचारासाठी येणार नाहीत, असे विधान सुभाष देसाई यांनी सांगितले होते. मात्र त्यात काही तथ्य नसून लवकरच मुख्यमंत्री सिंधुदुर्गात प्रचारासाठी येतील असेही ते यावेळी म्हणले. सिंधुदुर्गाच्या प्रचारसभेबाबत मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतही जाहीर केलं आहे असा टोला राणेंनी सुभाष देसाईंना लगावला. कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे हे भाजपाकडून निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, शिवसेना आणि राणे यांच्यातील वितुष्ट कधी संपणार यावरही राणे यांनी भाष्य करत ते म्हणाले, ” दोन्ही बाजूने कटुता संपण्याचा विचार होत असेल तर नक्की केला जाईल. आमची बाजू मजबूत आहे. आमचा विजय निश्चित आहे. मात्र राज्यभारत भाजपा शिवसेना युती असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र भाजपा शिवसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे टाकले असताना हे वितुष्ट लवकर संपेल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या : 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183264716287700993?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183266308856504320?s=20

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!