औरंगाबाद : शिवाजीनगर रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका यांची संयुक्त समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. या समितीने भुयारी मार्गाचा नकाशा व आराखडा तयार केला असून हा नकाशा अंतिम करण्याच्या दृष्टीने बुधवारी समिती सदस्यांनी संयुक्त पाहणी केली. शिवाजी चौक ते बीड बायपासपर्यंत २४ मीटरचा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यासाठी रेल्वेगेट ते बायपास दरम्यान सुमारे वीस हजार चौरस फूट जागा संपादित केली जाणार आहे.
शिवाजीनगर येथे रेल्वे फाटकावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल तयार करण्यात यावा अशी जुनी मागणी आहे. याबाबत अॅड. शिवराज कडू पाटील आणि अॅड. रूपेश जैस्वाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने रेल्वे आणि राज्य सरकारला आर्थिक तरतूद करून हे कार्य त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार राज्य सरकारने शिवाजीनगर रेल्वेगेटवरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि समस महापालिका यांची संयुक्त समिती स्थापन केली आहे.
रेल्वेकडून भुयारी मार्गासाठी लागणारा निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने भुयारी मार्गाचा आराखडा तयार केला आहे. महापालिकेने २४ मीटर रस्त्यासाठी भूसंपादन करण्याची तयारी सुरू केली आहे. मनपाच्या नगररचना विभागाचे उपअभियंता संजय चामले, सार्वजनिक बांधकाम विभागातील जागतिक बँक प्रकल्पाचे उपअभियंता एस. एन. सूर्यवंशी आणि रेल्वेच्या चार अभियंत्यांनी संयुक्तपणे स्थळ पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला भुयारी मार्गाचा नकाशा सादर केला. रेल्वेच्या अभियंत्यांनी नकाशावर चर्चा केली.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या रॅलीला परवानगी; एमआयएमला का नाही? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे- खा. जलील
- ‘केंद्र सरकार संविधान बदलू पाहतंय, भाजपला कडाडून विरोध करा’
- औरंगाबादेत जिन्सी प्रकरण रंगले; आजी-माजी प्रशासकांचा पलटवार!
- ‘या’ ठिकाणी आहे ‘देवमाणूस’ मधील डॉ.अजित कुमारचा पुतळा; पाहून बसेल धक्का
- औरंगाबादेत एसटी संपकरी ठाम; रुजु होण्यासाठी महामंडळाकडून ‘अल्टिमेटम’!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

