🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. या दरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा मध्येच स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर आली.
आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर अनेक विदेशी खेळाडू आपल्या मायदेशी परतले. मात्र मायदेशी परतण्याआधी न्युझीलंड संघाचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा सदस्य टीम सिफर्ट याला कोरोनाची लागण झाली होती. ही सर्व कोरोनावर मात करून आपापल्या घरी गेले आहेत. KKRचा फलंदाज टीम सेईफर्ट यानं त्याचा कोरोना काळातील अनुभव सांगितला आणि यावेळी तो ढसाढसा रडला.
Watch “Tim Seifert breaks down” on #Vimeo https://t.co/3q9AGZGmWp
— Swadesh Ghanekar (@SwadeshGhanekar) May 25, 2021
‘सर्व सहकारी आपापल्या घरी गेले आणि मी चेन्नईत १० दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये होतो, हा विचार करूनच तणाव वाढत होता. त्यात रोज मीडियात हजारो लोकांच्या निधनाच्या बातम्या ऐकून मन घाबरलं होतं, असेही तो म्हणाला. ”ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या बातम्या रोज येत होता आणि अशा परिस्थितीचा तुम्हाला सामना करावा लागला असता तर?, आता हा विचारही करवत नाहीय. कोव्हीड काय याबाबत मी अनभिज्ञ होतो,” असेही तो म्हणाला. ईफर्ट सध्या न्यूझीलंडमध्ये १४ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत आहे आणि ऑनलाईन मुलाखतीत त्यानं हा अनुभव सांगितला.
महत्वाच्या बातम्या
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- ‘मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी संघटना तयार करून राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करावेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

