Share

‘फ्रेंडस’लवकरच पुन्हा सर्वांच्या येणार भेटीला; भारतात ‘या’ प्लॅटफॉर्म होणार रिलीज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : प्रसिद्ध मालिका ‘फ्रेंडस’च्या चाहत्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ९०च्या दशकातीलही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. आता हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक असा शो आहे ज्याचे फॅनफोलोइंग प्रचंड आहे.  एचबीओ मॅक्स आपल्या वर्षपूर्तीच्या खास दिवशी ‘फ्रेंड्स: द रीयूनियन’ यूएस मध्ये झी ५ वर रिलीज करणार आहे. भारतातिल सर्वात मोठ्या होम- ग्रोन व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म झी ५ ने याची घोषणा केली आहे.

झी ५ इंडिया मधील चीफ बिजनेस ऑफिसर मनीष कालरा यांनी म्हंटले आहे की,”आम्ही ‘फ्रेंड्स: द रियुनियन’ भारतात आणण्यासाठी खूप उत्साही आहोत. ‘फ्रेंड्स ‘ही जगातील सर्वाधिक पाहिलेली आणि आवडती साइटकॉम आहे आणि ‘फ्रेंड्स’ च्या प्रशंसकासाठी ज्या शो विषयी मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे असा शो झी -५  वर प्रसारित करण्याची संधी मिळत आहे”.

https://www.instagram.com/tv/CPD9hThDmAw/?utm_source=ig_web_copy_link

तसेच ‘फ्रेंड्स’ मधील सर्वांच्या आवडतीचे कलाकार जेनिफर एनिस्टन, कटेर्नी कॉक्स, लिसा क्रुडो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी, डेविड श्विमर यांचा समावेश आहे. बेन विंस्टन याने ‘फ्रेंड्स’ मधील कार्यकारी निर्माता केविन ब्राइट, मार्टा कॉफमैन,डेविड क्रेन के साथ निर्मित विशेष आणि कार्यकारी निर्देशन करण्यात आले आहे. २७ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेत अनेक दिग्गज कलाकार भूमिकेत दिसणार आहे.

२२ सप्टेंबर रोजी १९९४ साली या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. यानंतर तब्बल दहा वर्षापर्यंत या मालिकेची मोहिनी रसिकांवर होती. जगभरात या मालिकेचे चाहते आहेत. ६ मे २००४ साली या मालिकेचा आखेरचा भाग प्रदर्शित झाला होता. ‘एचबीओ मॅक्स’ला वर्षपुर्ती झाल्याच्या पार्श्वभूमिवर ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!