Share

अपक्ष उमेदवाराच्या अपहरण प्रकरणी कॉंग्रेसच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी विधानसभा क्षेत्रातले अपक्ष उमेदवार पंचायत समितीचे माजी सभापती बग्गूजी ताडाम यांनी प्रचारातून माघार घ्यावी म्हणून त्यांचे  अपहरण केल्याची घटना आरमोरी येथे घडल्याची माहिती समोर आली आहे . या घटने प्रकरणी कॉंग्रेसचे माजी आमदार आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रातले कॉंग्रेसचे उमेदवार आनंद गेडाम यांच्यासह १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले  आहेत.

यावाबत अधिक माहिती अशी की काँग्रेसचे उमेदवार आनंद गेडाम यांचा मुलगा लॉरेन्स आणि त्याच्या साथीदारांनी ताडाम यांच्या पाठलाग करून त्याचं आणि अपहरण करून त्यांना रात्रभर बसवून ठेवण्यात आले. या यामध्ये माजी आमदार आनंद गोडाम यांचादेखील समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. गेडाम हे स्वतः त्यात सामील होऊन बग्गुजी ताडाम यांना शिवीगाळ आणि मारपीट केली, तसंच प्रचारातून माघार घेण्यासाठी धमकी दिल्याची तक्रार बग्गुजी ताडाम यांनी आरमारी पोलीस स्थानकात नोंदवली आहे.

दरम्यान, ताडाम यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार आनंद गेडाम व त्यांचा मुलगा लॉरेन्स आनंद गेडाम यांच्यासह एकूण अकरा जणांवर अपहरणाचे कलम 365 यासह 341, 342, 392, 143, 147, 37(1),(3) अशी वेगवेगळी कलमे लावून गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!