औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वतीने महानुभाव आश्रम येथे अन्नदान करण्यात आले आहे. तर युवासेनेच्या वतीने बीड बायपास, एमआयटी हॉस्पिटल, पुंडलिकनगर भागात अन्नदान करण्यात आले.
शिवसेना व युवासेना यांच्या माध्यमातून ही मोहिम शहरात सर्वच भागात शिवसैनिक राबवित असल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
जिल्हाभरात लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हा अन्नदानाचा यज्ञ सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले आहे. त्यामुळे कुठेही, कुणीही गरजू आढळल्यास संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गुरुवारी शिवसेनेच्या वतीने रोजी बीड बायपास, बजाज हॉस्पिटल, घाटी रुग्णालय व कर्करोग रुग्णालय व जेजे रुग्णालय परिसरातील गरजूंना अन्नदान करण्यात येत आहे. या अन्नदानावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हा युवाधिकारी तथा नगरसेवक ऋषिकेश खैरे, अॅड. आशुतोष डंख, प्रतीक बाफना, प्रत्युश कन्नडकर, सुनील दायमा आदी लोकांची उपस्थिती होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

