Share

‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या लाटीत अनेक मान्यवरांनाही या संसर्गाची लागण झाली आहे. तसेच या काळात देशभरात अनेक ठिकाणी अपुऱ्या औषधामुळे आणि अपुऱ्या ऑक्सिजनमुळे रुग्णांना जिव गमवावा लागत आहे. यादरम्यान भारताचे फ्लांइग सिख म्हणून प्रसिद्ध असेलेले मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनाची लागण झाल्यानंतर ते चंदीगडमध्ये आपल्या राहत्या घरीच विलगीकरणात राहुन उपचार घेत होते. मात्र सोमवारी २४ मे रोजी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिल्खा सिंग यांचा मुलगा आणि प्रसिद्ध गोल्फर जीव मिल्खा सिंग यांनी ही माहिती दिली. काही दिवसापासुन त्यांनी जेवण कमी केले होते. तसेच त्यांना अशक्तपणाही जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जीव यांनी दिली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जीव सिंग यांनी दिली आहे.

मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपुर्ण कुटुंबाची कोरोणा चाचणी करुण घेण्यात आली होती. तेव्हा घरातील दोन नोकरांचा कोरोना अहवाल सकारातम्क आला होता. तर इतर कुटुंबीयाची चाचणी निगेटिव्ह आली होती. यादरम्यान दुबई येथे असलेला त्यांचा मुलगा जीव हा शनिवारी भारतात परतला. आशीयाई खेळांमध्ये मिल्खा सिंग यांनी भारताला ४ सुवर्णपदक मिळवुन दिले होते. त्यांच्या धावण्याच्या शैलीमुळे पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख फिल्ड मार्शल आयुब खान यांनी मिल्खा सिंग यांना ‘फ्लाइंग सिख’ ही उपाधी दिली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!