नवी दिल्ली : तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्यासह इतर काही जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिल्लीसह संपूर्ण भारतात करोनाचं संकट वाढलं ते तबलिगी जमातच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या उत्सवामुळे. यामुळेच दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना मोहम्मद साद यांच्यासह इतर काही जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.
या पूर्वी तबलीघींविरोधात साथीच्या आजारासंबंधीचा कायदा आणि इतर अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर आता पोलिसांनी व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या १९०० जणांना लुकआउट नोटीसही जारी केली आहे.
दरम्यान,देशात कोरोना बाधितांची संख्या 10 हजार 363 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे की आतापर्यंत 1 हजार 35 रुग्ण बरे झाले असून 339 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या आता २८०१ झाली आहे. कारण या रुग्णांमध्ये ११७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. ११७ मधले १०० रुग्ण मुंबई पुण्यातले आहेत. ११७ पैकी ६६ रुग्ण हे मुंबईतले तर ४४ रुग्ण पुण्यातले आहेत. महाराष्ट्राची काळजी वाढवणारी ही बातमी आहे.
महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. देशभरातील करोनाग्रस्तांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाचे रुग्ण आहेत. अशात आता आज ११७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २८०१ इतकी झाली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

