Share

शेतकऱ्यांनी नुकसानाची चिंता करु नये, ठाकरे सरकार आपल्या पाठीशी खंबीर!

Published On: 

औरंगाबाद : भवन जि. प. सर्कल मधील विविध गावात सततची अतिवृष्टी तसेच मंगळवार (दि.२१) रात्री जवळपास ८८ मि.मि. पाऊस झाल्याने या भागात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी बुधवारी ( दि.२२ ) पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्तांनी चिंता करू नये, सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसान भरपाई बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेतील अशा शब्दांत युवानेते अब्दुल समीर यांनी नुकसानग्रस्तांना धीर दिला.

महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एकही नुकसानग्रस्त पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेत सरसकट नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनास दिलेले आहेत. त्यांनी या भागात प्रशासनाकडून सुरू असलेल्या पंचनामा करण्याच्या कामाचा बांधावर जावून आढावा घेतला. त्याअनुषंगाने नुकसानीचे पंचनामे करणे सुरू असून पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

यावेळी समीर यांनी भवन, पिंपळगाव पेठ, केऱ्हाळा ,निल्लोड, बनकीन्होळा आदी परीसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिके व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!