🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूडमधील ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. या चित्रपटातून बरच काही शिकण्यासारखे होते. मात्र या चित्रपटाचं एक सीन शूट करताना तर अभय आणि फरहान मरता मरता वाचले होते. असा एक अनुभव व्हिडीओमध्ये अभयन सांगितला आहे.
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटाची निर्माती जोया अख्तरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत चित्रपटातील काही ऑफस्क्रीन दृश्य दाखवण्यात आली आहेत. यापैकी एका सीनमध्ये हृतिक, फरहान आणि अभय बार्सिलोना ते कोस्टा ब्रावा प्रवास करत असतात. हृतिक गाडी चालवत असतो. दरम्यान हृतिकला ऑफिसमधून एक फोन येतो. फोनवर बोलण्यासाठी तो गाडी घाटात रस्त्याच्या बाजूला लावतो आणि गाडीतून खाली उतरतो. पण हृतिक गाडीतून उतरताना गाडी बंद करायला विसरतो. हृतिक खाली उतरताच गाडी पुढे सरकते. फरहान गाडीतून उडी मारतो आणि गाडीत बसलेला अभय घाबरतो. पण हृतिक पटकन येऊन गाडी बंद करतो.
https://www.instagram.com/tv/CPOBS3QJUBk/?utm_medium=copy_link
या प्रसंगाबद्दल अभयन व्हिडीओमध्ये आपला अनुभव सांगितला आहे. तो म्हणाला, आम्ही मरता मरता वाचलो. हृतिकमुळे मी आणि फरहान मरणारच होतो. फरहान खूप फास्ट आहे. त्यामुळं लगेच त्यानं उडी मारली. पण मी गाडीत अडकलो. त्याचा हा अनुभव ऐकून त्याच्यासोबत असलेले इतर कलाकार हसून त्याची भीती दूर करताना दिसत असल्याचे या व्हीडिओ मध्ये पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेश हे आता ‘नाथांचे नसून अनाथांचे राज्य’
- मराठा आरक्षणाअभावी शिक्षणाची संधी हुकली; धुळ्यात विद्यार्थ्याची आत्महत्या
- ठरलं तर ! ‘या’ तारखेला होणार भव्य मराठा आरक्षण मोर्चा
- देवमाणूस : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देणार रतन टाटा आधार
- चित्रपटात भूमिकेसाठी फोन केलेल्या दिग्दर्शकाला गागुंलीने दिले ‘असे’ उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

