🕒 1 min read
मुंबई : देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सोनू सूद पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे. कोरोनाच्या सध्याच्या महाभयंकर लाटेत सोनू लोकांचे जीव वाचवताना दिसतोय. देशात ऑक्सिजन आणि बेड्सचा प्रचंड तुटवडा आहे. याकरिता सोनू व त्याची टीम गरजू रुग्णांना आॅक्सिजन पुरवण्याचे व बेड्स उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. त्याच्या या कामाचे अनेक स्तरावरून कौतुक केले जात आहे.
नुकतंच त्याच्या एका फॅनने भिंतीवर त्याचं चित्र रेखाटून अनोख्या पद्धतीने त्याचे कौतुक केलं आहे. सोमिन जैन असं या फॅनचं नाव असून तो जबलपूरमधल्या सराफा इथे राहणारा असून तो फाईन आर्टचा विद्यार्थी आहे. तो राहत असलेल्या घरातील छताच्या भिंतीवर त्याने सोनू सूदचं हे चित्र रेखाटलंय. सोमिनने पेंटिग करतानाचा एक व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाउंट शेअर करून अभिनेता सोनू सूदला टॅग केला आणि हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘तुम्ही जे काम करत आहात त्यापुढे माझं हे आर्ट खूपच छोटं आहे, जबलपुरमध्ये एकदा नक्की भेट द्या सर’.
@SonuSood sir ❤️❤️
आप जो काम कर रहे हैं उसके सामने ये आर्ट बहुत छोटा है ????
जबलपुर जरूर आइये सर एक बार ????
You are superhero ❤️❤️ pic.twitter.com/TbIWEggnr1— somin ???????? (@sominz_artworkz) May 22, 2021
सोमिन जैनने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोनू सूदने हा व्हिडीओ शेअर करत एक कॅप्शन देत यावर उत्तर दिले की, ‘भेटूया लवकरच जबलपुरमध्ये’. सोनू सूदच्या या फॅनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. त्यानंतर सोनू सूदच्या या सुंदर पेंटिंगवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करत त्याच्या कलेचं कौतुक केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- बारावीच्या परीक्षांचा निर्णय लवकरच; राज्य सरकारांना २५ मे पर्यंत सूचना देण्याची वेळ
- निलेश लंकेंच चहुबाजुंनी कौतुक; भाजप आमदार श्वेता महाले म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

