टीम महाराष्ट्र देशा : संसदेतील मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या भाषणा वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे झोपले असल्याचा फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलाचं ट्रोल होत आहे. मात्र या फोटोचे सत्य आता उघडकीस आले आहे. हा फोटो यावर्षी ९ जानेवारी झालेल्या संसदेच्या कामकाजादरम्यानचा फोटो आहे. आणि या फोटोमध्ये अमित शहा हे झोपले नसून ते पुस्तक वाचत असल्याच दिसत आहे. त्यामुळे सोशल मिडियावर ट्रोल होणारा फोटो हा खोटा असल्याचं समोर आलं आहे.
राज्यसभेतील कामकाजादरम्यानचा एक फोटो सध्या वायरल होत आहे. या फोटोत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद बोलत आहेत. तर, त्यांच्या शेजारी बसलेले गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा दिसत आहेत. मात्र, अमित शहा राज्यसभेत झोपले असल्याचा दावा करण्यात येत आहे. फोटो वायरल करण्यात येत आहे. ‘राहुल गांधी यांनी फोन वापरला तर त्रास होतो. मात्र, शहा झोपले तर (त्रास) नाही’ असे ट्विटर वरून हा फोटो ट्विट करताना म्हंटले जात आहे.
राज्यसभा टीव्हीच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर हा व्हिडिओ आहे. व्हिडिओत केंद्रीय मंत्री संविधानातील १२४ व्या संशोधन विधेयकावर चर्चा करत आहेत. तर, त्यांच्याशेजारी असलेले अमित शहा त्यांचे भाषण ऐकत आहेत. व्हिडिओत आपण पाहू शकता की अमित शहा हातात एक पुस्तक घेऊन त्याची पाने चाळत आहेत.


