Share

लढा! ‘कोरोना’विरोधात : ‘माणुसकीचा धर्म जोपासत प्रत्येकाने ‘या’ लढाईत योगदान देण्याची गरज’

Published On: 

मुंबई : ‘कोरोना संकटामध्ये आपलाही देश असला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाने काळाची पावल वेळीच ओळखून घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे देशात करोना विरोधातची सामूहिक लढाई यशस्वी होत आहे,’ असं मत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले की, ‘माणूसकीचा धर्म जोपासत सामान्य माणसाला दिलासा आणि आधार देण्यासाठी प्रत्येकाने या लढाईत योगदान देण्याची गरज आहे,’ असं भावनिक आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.

तसेच आपत्तीत पंतप्रधानांनी सामान्य नागरिकांना एक लाख 70 हजार कोटी रुपयांच्या योजनांचे साह्य देऊन दिलासा दिला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी आता इतर देश करू लागले आहेत,’ असं देखील विखे पाटील म्हणाले.

दरम्यान, जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या संगमनेर तालुक्‍यातील 26 गावांमधील गरजूंना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!