Share

सोशल मिडियावरून प्रचार करू नका, १८ जणांना निवडणूक आयोगाची नोटीस

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच नेते वेगवेगळ्या मार्गाने प्रचार करताना दिसत आहेत. त्यातच सोशल मिडीयावर प्रचार करून तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. परंतु तुम्ही जर असले मेसेज व्हायरल करत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

सोशल मिडीयावर प्रचाराचे मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी नांदेडमध्ये निवडणूक विभागाने सोशल मीडियावरून प्रचार केल्याने १८ जणांना नोटीस दिली आहे. यात व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनचाही समावेश आहे. त्यामुळे तुम्हालाही अशाच प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे कोणताही मेसेज पुढे पाठवण्याआधी तुम्ही विचार केला पाहिजे.

दरम्यान, सोशल मिडीयावर अत्यंत थोड्या पैशांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकते. याचाच फायदा घेऊन उमेदवार प्रचारासाठी सोशल मिडीयाचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळेच निवडणूक आयोगाने दखल घेत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्यास सुरुवात झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182965079186165760?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182964788734783488?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182964519930253312?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!