Share

ईडी, सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण आता चालणार नाही; छगन भुजबळांचा भाजपवर हल्ला

Published On: 

🕒 1 min read

नाशिक:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही काँग्रेसचा उमेदवार विजयी ठरलाय. राज्यातील विधानपरिषद निवडणुकीतील पराभवातून भाजपने धडा घ्यायला हवा. त्यांनी आता जमिनीवर उतरून काम करायला हवे. देशात आता ईडी आणि सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण चालणार नाही, असे वक्तव्य राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. ते आज लासलगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, चंद्रकांतदादा पाटील पुण्यात मेधा कुलकर्णी यांच्या जागेवर निवडून आले. मात्र, त्यानंतर मेधा कुलकर्णी यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. काही दिवसांपूर्वी इतरांना इकडेतिकडे पाठवण्याची भाषा करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांचाच डाव उलटला आहे. पुणे आणि नागपूर या भाजपच्या बालेकिल्ल्यातही मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला. या सगळ्यातून भाजपने धडा घ्यायला हवा. त्यांनी जमिनीवर उतरून काम करायला हवे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यशोमती ठाकूर यांच्या टीकेला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यशोमती ठाकूर काय बोलल्या ते मी वाचले नाही. शरद पवार आणि सोनिया गांधी एकत्रितरित्या काम करतात. तेव्हा कोणी काही विचारले तर बोलावे लागते. याचा अर्थ टोचून बोलणे होत नाही, असे भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!