मुंबई : आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयने तातडीने आयपीएल स्पर्धा स्थगित केली. स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडूंनी चमक दाखवली. मात्र नुकत्याच इंग्लंड दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या कसोटी संघात नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. मात्र विजय हजारे ट्रॉफी पासून फॉर्मात असलेला पृथ्वी शॉला मात्र संघात स्थान मिळाले नाही.
मागच्या मोसमामध्ये मात्र शॉची कामगिरी निराशाजनक झाली होती. दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग याने एका मुलाखतीमध्ये पृथ्वी शॉबाबत धक्कादायक खुलासा केला होता. शॉ जेव्हा फॉर्ममध्ये नव्हता, तेव्हा त्याला नेटमध्ये सरावही करायचा नव्हता. पृथ्वी शॉला मी नेटमध्ये सराव करण्यासाठी आग्रह केला, पण त्याने मला नकार दिला, असं रिकी पॉण्टिंग म्हणाला होता. रिकी पॉण्टिंगच्या या वक्त्यव्यावर आता पृथ्वी शॉने प्रत्युत्तर दिलं आहे.
क्रिकबझशी बोलताना पृथ्वी म्हणाला, ‘अशीही वेळ आली, जेव्हा माझ्या रन होत नव्हत्या. मी मेहनत करत होतो, पण त्याचे चांगले परिणाम दिसून येत नव्हते, त्यामुळे मी हैराण झालो होतो. वारंवार प्रशिक्षण घेण्यात मला काहीच अर्थ वाटत नव्हता. मागच्या वर्षी मी जास्त रन करत नव्हतो. मला बॅटिंग करायची होती, पण रनच मिळत नव्हत्या. मी प्रशिक्षण सुरू ठेवलं, पण तरीही मनासारखे परिणाम येत नव्हते, त्यामुळे एक वेळ अशी आली जेव्हा मी वैतागलो. जर परिणामच मिळत नसतील, तर मी सरावही बंद करतो, असं सांगितलं,’ असं शॉ म्हणाला.
महत्वाच्या बातम्या
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- बारावीच्या परीक्षांचा निर्णय लवकरच; राज्य सरकारांना २५ मे पर्यंत सूचना देण्याची वेळनिलेश लंकेंच चहुबाजुंनी कौतुक; भाजप आमदार श्वेता महाले म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

