🕒 1 min read
मुंबई : देशात लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया कंपन्या म्हणजेच फेसबुक , ट्विटर आणि इंस्टाग्रामसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजी भारत सरकारच्या MEITY ने सर्व सोशल कंपन्यांना नवीन नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिने दिले होते. यामध्ये भारतात आपला अधिकारी आणि कॉंटेक्स अॅड्रेस देणे, अनुपालन (कम्प्लायन्स) अधिकाऱ्यांची नेमणूक, तक्रारीचे निवारण, आक्षेपार्ह कंटेंटचे निरीक्षण करणे, अनुपालन अहवाल आणि आक्षेपार्ह कंटेंट काढून टाकणे अशा नियमांचा समावेश आहे.
आतापर्यंत या कंपन्यांनी सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन केलेलं नाही. त्यामुळे आता Facebook, Twitter आणि Instagram हे तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भारतात 2 दिवसांनंतर बंद होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान आता नव्याने सुरु झालेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Koo ने सरकारच्या नियमांचे पालन करण्यास सुरवात केली असल्याची माहिती सध्या मिळत आहे.
हे आहेत सरकारचे आदेश?
25 फेब्रुवारी 2021 रोजी भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया कंपन्यांना 3 महिन्यांच्या आत काही सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले होते, ते आदेश भारत सरकारच्या गॅझेटमध्येही प्रकाशित केले गेले होते. आदेशानुसार, सोशल मीडिया कंपन्यांना भारतात अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले गेले होते. तसेच हे सर्व अधिकारी भारतात असणे आवश्यक आहे. या आदेशात असेही म्हटले होते की, सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवर किंवा मोबाईल अॅपवर फिजिकल कॉन्टेक्स पर्सनची माहिती द्यावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देईन; संभाजीराजेंची डरकाळी !
- राज्य कसं पेटून उठेल याकडं भाजपचं लक्ष – अशोक चव्हाण
- …अन् मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या मेटेंनी केलं अजितदादांच कौतुक !
- …हा महाराष्ट्रावर अन्यायच; एकनाथ खडसेंच पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
- ‘फडणवीसांनी आरक्षणासाठी अमृत महामंडळाची घोषणा केली, पण ठाकरे सरकारने बोऱ्या वाजवला’


