तुळजापूर – तिर्थक्षेञ तुळजापूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शन पासची संख्या प्रतिदिनी बारा हजारावर आणली असुन याची अमंलबजावणी २०फेब्रुवारी पासुन होणार आहे.श्रीतुळजाभवानी मंदीर परिसरात काही मंडळीचा रिपोर्ट कोरोना पाँजीटीव्ह आल्याने मंदीर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे,
राज्यातील मंदिरं सुरु केल्यानंतर तुळजाभवानी मंदिरात गर्दीच्या दिवशी 30 हजार भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिली जात होती. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे आता ही संख्या निम्यावर आणण्यात आली आहे. आता रोज फक्त 12 हजार दर्शन पास दिले जाणार आहेत. तर 2 हजार पेड पास दिले जातील. त्याचबरोबर 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि 10 वर्षाखालील मुलांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी असे 3 दिवस मोठी गर्दी असते. त्यामुळे हे 3 दिवस आणि मोठ्या सण, उत्सवाला 30 हजार मोफत पास दिले जात होते. तर इतर दिवशी 20 हजार मोफत पास दिले जात होते. पण आता ही संख्या निम्म्यावर आणण्यात येणार आहे.आता प्रतिदिन बारा हजार दर्शन पासेस वितरीत केले जाणार आहेत.
सध्या मंदीर दोन तासाला सँनिटायझर केले जात असुन मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.कोरोना चा धोका वाढल्यामुळे तिर्थक्षेञ तुळजापूर ची रुळावर आलेली गाडी पुन्हा घसरली आहे या निर्णयाचा मोठा फटका शहरातील व्यापारी वार्गांना बसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- तरुण शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धती स्विकारून शेतीत क्रांती घडवावी : रावसाहेब दानवे
- सिंचन प्रकल्पावरुन जिल्हा परिषद आणि राज्य सरकारमध्ये जुंपली
- ‘राजे’ तुमच्या विचारांचे पालन करणार, चिमुकल्यांचा शिवजयंती दिनी निर्धार
- लॉकडाऊनसारखी कठीण परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास शेतकऱ्यांना अडचणी येऊ देणार नाही; खोतकर
- यंदा आयपीएल ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर जिंकणार मैक्सवेलने दाखवला विश्वास


