मुंबई : पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली असून मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. भांडूप, कांजूर, विक्रोळी दरम्यान रेल्वे रूळावर पाणी साचलं आहे. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक या दोन्ही सेवांवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेद मंदावला आहे. तर रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रेल्वे उशिराने धावत आहे.

पश्चिम रेल्वेचे वाहतूक १० मिनिटे उशिराने धावत असून मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक २० मिनिटे उशिराने, तर हार्बर मार्गावरील वाहतूक सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने होत आहे. नवी मुंबईत अनेत ठिकाणी मुसळधार पावसानंतर पाणी साचले आहे. नाल्यांमधील गाळ न काढल्यामुळे रस्त्यांवर दोन-दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. यामुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

