Share

सतत माहेरी जाणाऱ्या पत्नीचे दारुड्या नवऱ्याने चावून नाकच तोडलं

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- पत्नी सतत माहेरी जाण्याचा हट्ट करत असल्याने एका दारुड्या पतीने रागाच्याभरात तिच्या नाकाचा चावा घेतला. हा चावा त्याने एवढ्या जोरात घेतला कि नाकच तुटल्याने तिला श्वास घेणेही कठीण झाले आहे. रामचंंद्र असे पतीचे नाव आहे.

रामठीमध्ये राहणाऱ्या रेखा चे लग्न मध्यप्रदेश मधील नाहरगढ़ येथील रामचंंद्र याच्यासोबत झाले होते. नवऱ्याच्या दारू पिण्याच्या कारणावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत असे. सोमवारी पती- पत्नीमध्ये माहेरी जाण्यावरून जोरदार भांडण झाले. पत्नी उलट उत्तर देत असल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या संजयने रागाच्या भरात तिच्या नाकाचा जोरदार चावा घेतला. यात तिचे नाकच तुटले. पत्नी रक्तबंबाळ झाल्याचे बघून हादरलेल्या संजयने घरातून पळ काढला.

त्यानंतर शेजाऱ्यांनी तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. पण नाकाला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तिला कृत्रिम नाक लावण्याचा सल्ला दिला. त्यावरील शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नसल्याचे महिलेने डॉक्टरांना सांगितले. यामुळे सध्या तिला कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!