Share

खा. नवनीत कौर यांची भाजपशी जवळीक वाढली, कृषीमंत्र्यांचा केला भव्य सत्कार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अमरावतीच्या नवनिर्वाचित खा. नवनीत कौर राणा या भाजप नेत्यांच्या संपर्कात असून येत्या काही दिवसात त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहेत. तसेच राणा यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट देखील घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एका बाजूला राणा भाजपची जवळीक वाढल्याची चर्चा असताना आता कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा सत्कार युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने आमदार रवी राणा यांनी केल्याचा विषय चर्चेचा ठरला. रविवारी अमरावती जिल्ह्यात होते. पहिल्यांदाच मंत्री म्हणून आल्याने त्यांचा मोर्शी विधानसभा मतदार संघात वरुड, मोर्शी, शेंदुर्जना घाट, हिवरखेड येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. अमरावतीत शहर भाजप कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला.

रात्री ११ वाजेच्या सुमारास डॉ. अनिल बोंडे हे पत्नी डॉ. वसुधा बोंडे यांच्यासह आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी औक्षण करून ‘जय हो कृषिमंत्री’ म्हणत बोंडे दाम्पत्यांचे स्वागत केले. यानंतर अनिल बोंडे यांना पुष्पहार घालून राणा दाम्पत्याने सत्कार केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!