Share

भाजप नेत्यांची महिलांबाबतची डझनभर प्रकरणे ; वडेट्टीवारांचा घणाघात

Published On: 

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर महाविकास आघाडीमधील मंत्री संजय राठोड यांच्या या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत. त्यामुळे भाजपने महाविकास आघाडीचा ह्या प्रकरणावर खरपूस समाचार घेतलेला आहे.

दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

विजय वडेट्टीवार या राजीनाम्याच्या वृत्तावर बोलताना म्हणाले की, शिवसेनेच्या एकाही नेत्याने आतापर्यत राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण, यात तथ्य असेल तर हा मीडिया ट्रायलचा परिणाम असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. त्याचबरोबर भाजप नेत्यांची महिलांबाबतची डझनावरी प्रकरणे मला सांगता येतील. पण, त्यांना नैतिकता लागू होत नाही. तिथे नैतिकता संपुष्टात येते, असे वडेट्टीवार म्हणाले.

सतत संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये चर्चेत आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. प्रसारमाध्यमांमधील वृत्तांनुसार मंगळवारी मातोश्रीवर संजय राठोड यांनी आपला राजीनामा पाठवला असून तो मुख्यमंत्र्यांनी मान्य केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी हा राजीनामा त्यांनी दिला की इतर काही कारणासाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासोबतच, राठोड यांच्या एका जवळच्या व्यक्तीने राजीनाम्याचे वृत्त फेटाळले आहे. सोबतच, ही एक अफवा असल्याचाही दावा केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!