टीम महाराष्ट्र देशा : राज्यात झालेल्या कॉंग्रेसच्या पराभावाची जबाबदारी स्वीकारायला मी तयार आहे. कार्यकर्त्यांनी पराभवामुळे खचून जाऊ नये, कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागा. असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हंटले. ते माध्यमांशी बोलत होते
दरम्यान, तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का? असा प्रश्न अशोक चव्हाण यांना माध्यमांनी विचारला त्यावेळी, पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे त्यांनी म्हंटले.
लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव करत कॉंग्रेस आघाद्दी विजय मिळवणार असे अनेक वक्तव्य कॉंग्रेच्या नेत्यांनी केले होते. परंतु निकालादरम्यान तसे काही झाले नाही. राज्यात ४१ जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर ६ जागांवर कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडी आघाडीवर आहे. राज्यात भाजपा २३, शिवसेना १८, कॉंग्रेस १, राष्ट्रावादी ५ तर वंचित १ जागांवर आघाडीवर आहे.
विशेष म्हणजे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेड लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु त्यांचाही भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ५० हजार मतांनी त्यांचा पराभव केला आहे. त्यामुळे पराभवाची जबाबदारी अशोक चव्हाण यांनी स्वीकारली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

