Share

आता मांडवली करु नका; नरेंद्र पाटलांचा शिवेंद्रराजे व शशिकांत शिंदेंना टोला

Published On: 

सातारा:- जावळी-सातारा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसनं शशिकांत शिंदेच्या रूपानं तिथं पुन्हा एकदा ताकद उभी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून आता शिवेंद्रराजे व शशिकांत शिंदे असा सामना रंगला आहे. शिवेंद्रराजे यांनी विरोधकांना संपवण्याची भाषा केल्यामुळं या वादाला अधिकच धार चढली आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवेंद्रराजे भोसले यांनी जाहीर कार्यक्रमात, ‘मी उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवून निवडून आलेला माणूस आहे. समोरच्याची वाट लागल्याशिवाय गप्प बसत नाही, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख शशिकांत शिंदे यांच्या दिशेने असल्याची चर्चा होती. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनीही शिवेंद्रराजे यांना प्रत्युत्तर दिले होते.

दरम्यान आता शिवेंद्रराजे व शशिकांत शिंदेंच्या वादात माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी उडी घेतली आहे. साताऱ्यात कोरेगाव विधानसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदेंना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. जो माणूस संघटनेचा होऊ शकत नाही, तो मतदारांचा कसा? असा सवाल करत नरेंद्र पाटील यांनी टीका केली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मांडवली करु नका, असं म्हणत नरेंद्र पाटलांनी दोन्ही नेत्यांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!