🕒 1 min read
मुंबई : राज्यातील कोरोना बाधित रुग्नांची संख्या सतत वाढत आहे. मात्र दुसरीकडे ही आकडेवारी असली तरी कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्याचे प्रमाणही वाढत आहे. रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद, आरोग्य यंत्रणेचे परिश्रम यामुळे आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी सुमारे 265 रुग्ण बरे झाले आहेत.
याचप्रमाणे कोरोनाची लागण झालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील रुग्ण आता बरे होऊ लागले आहेत. आता पर्यंत 60 रुग्णांपैकी 20 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या चार ते पाच दिवसात जवळपास 9 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
दिलासादायक म्हणजे कोरोनावर मात करणारे 6 महिन्याचे बाळ सुद्धा बरे झाले आहे. त्याचे वडील सुद्धा बरे होऊन घरी आले आहेत. एवढंच नाहीतर या बाळाच्या आजीला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. त्यांनीही कोरोनाला चारीमुंड्या चीत केलं आहे.
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महापालिके अंतर्गत येणाऱ्या परिसरातही ‘कोरोना’चा विळखा वाढताना दिसत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 48 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक हे भोसरी, दिघी, चऱ्होली, बोपखेल भागात आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

