Share

दिलजीत दोसांझने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केली १ कोटीची मदत; खरेदी केले जातील गरम कपडे

Published On: 

मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज दहावा दिवस आहे. केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या सत्राला सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत देखील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर अजूनही ठाण मांडून आहेत.

दिल्लीतील विज्ञान भवन येथे सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी काल पार पडली मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. दरम्यान, पंजाबी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटीही आता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजितसिंह दोसांझ शनिवारी सिंघू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकर्‍यांना भेटण्यासाठी पोहोचला होता.

आता बातमी मिळत आहे की, सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वृद्ध आहेत आणि सध्या थंडीचे वातावरण आहे, हे ध्यानात घेऊन दिलजितने हिवाळ्यापासून बचाव करण्यासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या पैशांमधून शेतकरी गरम कपडे खरेदी करु शकतील.

पंजाबी गायक सिंघाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही बाब उघडकीस आणली. त्याने या उदात्त कारणासाठी दिलजितचे आभार मानले आहेत. पंजाबी गायक सिंघाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दिलजीतचे आभार मानत आहे. तसेच त्याने अभिनेत्याच्या उदात्त कार्याबद्दल त्याचे कौतुकही केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!