🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी मी सर्वांशी चर्चा केली. ग्रामीण आणि शहरातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतले. त्यावेळी तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे म्हणणारे भूमकर आज विरोधात उभे आहेत. भूमकर यांची उमेदवारी अपक्ष राजेंद्र राऊत यांनी पुरस्कृत केली आहे, अशी टीका शिवसेना उमेदवार दिलीप सोपल यांनी केली आहे. वैराग भागातील गावभेटी दरम्यान ते बोलत होते.
माझ्या घराण्याचे मूळ गाव वैराग आहे. व्यापार आणि शेतीच्या निमित्ताने आजोबा दुसरीकडे गेले. गेली दहा वर्षांपासून या भागाने मला भरभरून दिले आहे. विरोधकांना आजचं वैरागची अस्मिता कशी आठवली. मी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी तुम्हीच आमचा पक्ष आहात, आपण घेईल तो निर्णय मान्य असल्याचं भूमकर म्हणाले. मग आता एकदम त्यांचं पक्षप्रेम कसं काय उफाळून आलं. नेमकं काय गौडबंगाल आहे, याची माहिती घेतली असता त्यांची उमेदवारी अपक्ष उमेदवार राऊत यांनी पुरस्कृत केल्याचं समोर येत आहे, असा आरोप सोपल यांनी केला.
दरम्यान, वैराग भागाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे. आमदारकी आणि मंत्री पदाच्या काळात या भागामध्ये अनेक विकासकामे मार्गी लावलाचं दिलीप सोपल यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182566044377874432?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182557658542305280?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

