टीम महाराष्ट्र देशा : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. दोन दिवसापूर्वी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तसेच, धनंजय मुंडे यांच्यावर दाखल केलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यालाही स्थगिती देण्यात आली आहे.
औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच, धनंजय मुंडे यांच्यावर आज दाखल केलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यालाही स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे धनंजय मुंडे यांनी स्वागत केले. आणि सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया दिली.
जगमित्र साखर कारखान्यासाठी जमीन खरेदी करताना सरकारी जमिनीचे बेकायदा हस्तांतर करून घेतल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शासकीय जमीन अनधिकृतपणे खरेदी केल्याचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात जाऊन पोहचले असतानाचं. धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

