🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा:- मुख्यमंत्री म्हणतात, इथे लढाईच नाही. कुस्तीसाठी कोणी समोर नाही. पण कुस्ती पैलवानांची होते. अशांची (हातवारे करून) होत नाही, अशी टीका बार्शी येथे बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव मधील सभेत बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
फडणवीस म्हणाले , खरा पैलवान कोण? हे जनता 24 ऑक्टोबरला दाखवून देईल. तसेच आम्ही काही नटरंग नाही. त्यामुळे आम्ही हातवारे करत नाहीत . तसेच ते आम्हाला शोभतही नाही. सध्याच्या परिस्थितीमुळे शरद पवार यांची मानसिकता ढासळली आहे. त्यामुळे ते हातवारे करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर केली.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा आज जळगावात झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183286384062164992?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183293895825743874?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

