🕒 1 min read
Devendra Fadanvis | मुंबई : मुंबईत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांच्यावर आधारित एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने २०१४ मध्ये फक्त चार जागांसाठी युती तोडली आणि बेईमानी केली असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, “शिवसेनेने बेईमानी केली, पण अमित शाह (Amit Shah) यांच्या रणनीतीच्या जोरावर आपण निवडणूक जिंकली.” पुढे ते म्हणतात, “महाराष्ट्राच्या २०१४ च्या निवडणुकीत आपण शिवसेनेसह युती करण्यास तयार होतो. आपण कमी जागा लढण्यासही तयार होतो. पण केवळ चार जागांसाठी शिवसेनेने युती तोडली.
“अचानक युती तुटल्यानंतर वर्षानुवर्ष ११७ जागा लढणारा भाजपा, एका दिवसात २८८ जागा लढण्यास तयार झाला. याचं एकमेव कारण म्हणजे अमित शाह आपल्या पाठीशी उभे होते,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. शिवाय निवडणुकीतील अनेक गोष्टी, तंत्र त्यांनी आपल्याला शिकवल्या. त्यातून पहिल्यांदाच महाराष्ट्रात भाजपाचं स्वत:चं सरकार आपण पाहिलं. यामध्ये अमित शाह यांचा सिंहाचा वाटा आहे,” असं कौतुक फडणवीसांनी केलं.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अमित शहांवर स्तुतीसुमने उधळली. अमित शाह यांच्या नेतृत्वात आपण उत्तम प्रकारे निवडणूक लढलो. दोन-अडीच महिने ते महाराष्ट्रात राहिले. याच कार्यालयात ते मुक्काम करायचे, दिवस घालवायचे. निवडणुकीत सगळ्या प्रकारची मदत त्यांनी केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- IPL 2023 | आयपीएल मधून पोलार्डने घेतली निवृत्ती, जाता जाता म्हणाला…
- Munde | मुंडे बहिण-भाऊ आले एकाच व्यासपीठावर अन् मग झालं असं काही की, सभागृहात नुसताच हश्शा पिकला
- Vinayak Raut | “राजन साळवी शिंदे गटात सामील होणार?”; विनायक राऊत म्हणाले, “खाल्ल्या मिठाला…”
- Ajit Pawar | “वाचाळविरांना आवरा” ; अजित पवारांचे एकनाथ शिंदेंना आव्हान
- Arvind Sawant | “रात्रीस खेळ चाले!”, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंंत्र्यांच्या भेटीवर अरविंद सावंतांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

