लातूर : रेणापूर तालुक्यातील पन्नगेश्वर शुगर मिल्स हा साखर कारखाना गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि संकटात सापडलेला साखर उद्योग यामुळे अडचणीत आला होता. संकटाच्या काळात भाजपाच्या नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून शेतकऱ्यांच्या हितासाठी पन्नगेश्वर साखर कारखाना सुरू केला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी सांगितले.
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी रेणापूर-पानगाव भागातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय लक्षात घेवून पन्नगेश्वर शुगर मिल्स हा साखर कारखाना पानगाव परीसरात उभा केला होता. काही वर्षापासून कधी कमी पाऊस तर कधी बऱ्याच भागात सातत्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीमुळे पन्नगेश्वर शुगर मिल्स हा साखर कारखाना अडचणीत आला होता.
पण भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी या भागातील शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेतली आणि पन्नगेश्वर साखर कारखाना अडचणीत असतानाही शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केला. त्याबद्दल पंकजाताई यांचे आभार व्यक्त करण्यासाठी पन्नगेश्वर कारखान्याचे सरव्यवस्थापक दिलीप बरुळे यांचा शेतकऱ्यांच्या वतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते शुक्रवारी सत्कार करण्यात आला. यावेळी आ. रमेशआप्पा कराड यांनी सरव्यवस्थापक बरुळे यांच्याशी कारखान्याच्या गळीत हंगाम आणि ऊस गाळपाची यंत्रणा बाबत सविस्तर चर्चा करून माहिती घेतली.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

