🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन आहे. यामुळे देशाची आर्थिक चाकं थांबली असून लोकांना आपली रोजीरोटी कमवनही अवघड झालं आहे. याच गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने देशातील गरीब जनतेला थेट लाभ हस्तांतर करत जन धन बँक खात्यावर रक्कम जमा केली आहे.
गरीब गृहीणींना घरातील समान घेता यावं यासाठी सरकारने गरीब महिलांच्या जन धन बँक अकाउंटमध्ये ५०० रुपये जमा केले आहेत. परंतु हे पैसे खऱ्या गरजूंना मिळत नसून इतरांनाच मिळत असल्याचं शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.
त्यांनी ट्वीटरवर डीडी न्यूज या वाहिनीने टाकलेल्या व्हीडीओचा दाखला दिला आहे यात महिला आपल्याला ५०० रुपये मिळाले असून पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त करत आहे. चतुर्वेदी म्हणाल्या,
‘आशा आहे या व्हिडिओमुळे आमच्या अर्थमंत्री काळजी घेतील आणि हे ५०० रुपये ज्यांना गरज नाही त्यांच्याऐवजी ज्यांना या अडचणीच्या काळात खरंच पैशांची गरज आहे त्यांच्याच खात्यात जमा होतील. ‘
Hoping this video will alert our Finance Minister that the amount of Rs500 is perhaps being wrongly credited to those who may not need it instead of those who desperately need it during this crisis. https://t.co/esFY8zrwnF
— Priyanka Chaturvedi???????? (@priyankac19) April 17, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

