Share

विराट कोहलीचे कौतुक करणाऱ्या पोस्टवर डेव्हिड वॉर्नरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमधील एक अव्वल फलंदाज आहे. क्रिकेटच्या तिनही प्रकारात विराटने चागंली कामगीरी करत त्याने हे सिद्ध केले आहे. जगातल्या कोणत्याही गोलंदाजाची धुलाई करण्यात तो सक्षम आहे. त्याच्या याच कारकिर्दीबाबत एका वेब पोर्टलने एक पोस्ट केली होती.

विराट कोहलीबाबत केलेल्या या पोस्टवर डेव्हीड वॉर्नरने अशी प्रतिक्रीया दिली की ती प्रतिक्रीया सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे. विराट कोहलीच्या त्या पोस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या खेळत असलेल्या खेळाडूंचा उल्लेख होता. आणि आंतरराष्ट्रीय शतकाची आकडेवारी होती. विराट कोहली या यादीत ७० शतकासह आघाडीवर होता. तर डेव्हीड वॉर्नर हा ४३ शतकासह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होता. या पोस्टला कॅप्शन देताना विराट हा इतर खेळाडूपेक्षा बराच पुढे आहे, त्याला गाठणे शक्य नाही अशा आशयाची पोस्ट केली होती.

या पोस्टवर डेव्हिड वॉर्नरने या पोस्टचा स्किनशॉट काढत ‘असे म्हणायला हरकत नाही की विराटला कोणीच गाठु शकत नाही.’ अशी भन्नाट प्रतिक्रिया दिली. वॉर्नरने दिलेल्या या प्रतिक्रीयेनंतर ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४३ तर कसोटीत २७ शतके आहेत. तर डेव्हिड वॉर्नरच्या नावे एकदिवसीय सामन्यात १८ तर कसोटी सामन्यात २४ आणि टी-२० मध्ये १ शतक आहे. विराट कोहलीने २०१९ पासुन एकही शतक झळकावले नाहीये. आगामी इंग्लंड दौऱ्यात तो शतक झळकावेल अशी आपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!