औरंगाबाद : राज्यभरात प्लास्टिक बंदी असूनही तिचे पालन होताना दिसत नाही. शहरात प्रचंड प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर नागरिक तसेच दुकानदारांकडून सुरू आहे. याविरोधात औरंगाबाद मनपा अनेक दिवसांपासून कारवाई करत आहे. परंतु पहिल्यांदाच धडक कारवाई करत मनपाने तब्बल 4 लाख 53 हजारांचे 2 हजारांतून जास्त किलो प्लास्टिक जप्त केले.
शनिवारी एका गाडीत प्लास्टिक पिशव्यांची गोणी घेऊन जाताना मनपाच्या नागरिक मित्र पथकाच्या लक्षात आले. त्यांनी चालकाला थांबवून प्रश्न विचारले, परंतु उडवाउडवीची उत्तरे मिळाली. यामुळे गाडीची तपासणी केल्यावर 66 बॉक्समध्ये तब्बल 2 हजार किलो प्लास्टिक आढळले. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात असून मनपाने चालकासह वितरक आणि निर्मिती करणाऱ्यावरही गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्यांदाच एखाद्या प्लास्टिक निर्माता, वितरक आणि चालकावर गुन्हा दाखल केल्याचे समोर आले आहे.
मनपाचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाईचे आदेश दिले असून विशेष मोहीमही राबवली जात आहे. मनपा आणि नागरिक मित्र पथक उभारून त्यांच्या साहाय्याने अवैध प्लास्टिक साठ्यांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. शासनाने ठरवून दिलेल्या 50 एमएम जाडीपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर ही कारवाई होत आहे. यामुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पियुष गोयल शेतीतज्ज्ञ आहेत हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली : शरद पवार
- ‘उस्मानीचे भाषण ऐकले नाही, मुळात एल्गार परिषदेला महत्व देत नाही’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- शेतकरी आंदोलनावरील आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर पंतप्रधानांच भाष्य
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

