Share

शहरातील गर्दीच्या ठिकाणी मनपा उभारणार १०० स्वच्छतागृहे

Published On: 

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी शहरात मुख्य बाजारपेठांसह प्रमुख रस्त्यांवर शंभर ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. आज (दि. १८) पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी महिलांसाठी ५० तर पुरूषांसाठी ५० असे एकूण १०० स्वच्छतागृह तत्काळ उभारण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी गुरूवारी त्यांनी रिएंफोर्सड प्लास्टिकमध्ये बनवलेल्या स्वच्छतागृह मॉडेलची पाहणी केली.

शहरातील मुख्य बाजारपेठा तसेच प्रमुख रस्त्यांवर पालिकेकडून सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था कुठेही करण्यात आलेली दिसत नाही. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या औरंगपुरा, गुलमंडी, सराफा, शहागंज, निराला बाजार येथे सार्वजनिक स्वच्छतागृह असले तरी यातील काही स्वच्छतागृह देखभाल दुरुस्तीअभावी बंद अवस्थेत आहेत.

बोटावर मोजण्याएवढेच स्वच्छतागृह शहरात सुरू आहेत. त्यामुळे पालिका आयुक्‍त पांडेय यांनी वर्षभरापूर्वी शहरात १०० ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. फायबरपासून तयार केलेले हे स्वच्छतागृह असतील. त्यामुळे जागाही कमी लागणार असून किंमतही कमी असेल. ५० महिलासाठी तर ५० पुरुषांसाठी स्वच्छतागृह उभारण्यासंदर्भात अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश देखील त्यावेळी आयुक्‍त पांडेय यांनी दिले होते.

स्वच्छतागृह तत्काळ बसवण्याचे आदेश रिएंफोर्सड प्लास्टिकमध्ये मजबूत व दर्जेदार महिला व पुरुषांसाठी युरिनल्स (स्वच्छतागृह) मॉडेलची गुरूवारी पालिका मुख्यालयात आयुक्‍त पांडेय यांनी पाहणी केली. यावेळी शहरातील ज्या ज्या मुख्य आणि गर्दीच्या ठिकाणी युरिनल्स उपलब्ध नाहीत, अशा १०० ठिकाणी ५० महिलांसाठी आणि ५० पुरुषांसाठी युरिनल्स बसविण्याचे आदेश त्यांनी घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांना दिले. त्यानुसार आता लवकरच शंभर स्वच्छतागृह बसवले जाणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!