परभणी : कोरोना लस आपल्या भारतीयांनी शोधून काढली आहे. ती पुर्णपणे सुरक्षित आहे. लसीकरण मोहिमेमध्ये मी पहिल्या टप्प्यात लस घेतली असल्याचे प्रतिपादन परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले.
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील केंद्रात कोरोनाची प्रतिबंधक लस घेतली आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना लसीकरण केंद्रामध्ये जावून ही लस घेतली. ते पुढे म्हणाले की, लसीकरणाची भिती मनातून दुर करावी. लसीकरणाचा पहिल्या टप्पामध्ये शासनाने कोव्हिड – १९ च्या निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणातील संबंधित अधिकारी – कर्मचारी यांचाही समावेश आहे. टप्याटप्यामध्ये ही लस सामान्य नागरिकांनी देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, डॉ. बाळासाहेब नागरगोजे तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. शनिवारी शहरातील दहा ठिकाणी लसीकरण करण्यात आले. दरम्यान ५४५ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. दरम्यान उद्दीष्टांच्या तुलनेत ५४ .५० टक्के लसीकरण करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- पियुष गोयल शेतीतज्ज्ञ आहेत हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली : शरद पवार
- ‘उस्मानीचे भाषण ऐकले नाही, मुळात एल्गार परिषदेला महत्व देत नाही’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- शेतकरी आंदोलनावरील आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर पंतप्रधानांच भाष्य
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

