Share

#Corona : डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश बुलढाण्यातील पहिल्या तीन कोरोना रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

Published On: 

🕒 1 min read

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. पहिल्या तीन कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमधून थोड्या वेळापूर्वी डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुलडाणा शहरात पहिल्या कोरोना संसर्गिताचा मृत्यू झाला होता.. त्याच्या संपर्कातील हे तीन जण मागील 18 दिवसांपासून क्वारंटाईन होते. उपचारानंतर त्यांच्या तिन्ही कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने त्या तिघांनाही सुटी दिली. मागील 18 दिवसांपासून क्वारंटाईन होते.

बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात पहिला कोरोना रुग्ण, की ज्याच्या मृत्यूनंतर त्याला कोणाची पुष्टी झाली होती. त्याचीच 65 वर्षीय आई, 13 वर्षीय मुलगी व 10 वर्षीय मुलगा हेही झालेल्या तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. दुसरा रिपोर्ट बुधवार 15 एप्रिल रोजी निगेटिव्ह आला होता. तर तिसराही रिपोर्ट आज शुक्रवार 17 एप्रिल रोजी निगेटिव्ह आल्याने त्यांना हॉस्पिटलमधून थोड्या वेळापूर्वी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान आरोग्य यंत्रणा, डॉक्टर्स, नर्स यांच्या प्रयत्नांना यश आले असून बुलढाण्यातील नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. बुलढाण्यात अजूनही 17  कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मात्र त्यांच्यावरही डॉक्टर्सकडून उपचार सुरु आहे. त्यामुळे आता नागरिकांनी नियमांचे पालन वेळोवेळी केले तर या कोरोनावर विजय मिळवण्यात बुलढाणा जिल्हा यशस्वी होईल, असे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

RAW : Research Analysis Wing | #भारताची_गुप्तहेर_संघटना

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!