Share

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारानंतर तपासणी अहवाल निगेटिव्ह; मिनी घाटीत 20 रुणांवर उपचार

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाबाधित (कोविड 19) असलेल्या एका रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर त्यांची पुन्हा घेतलेली चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्या रुग्णास शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज सुटी दिल्याचे घाटीचे डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.

मिनी घाटीत आज 64 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 20 जणांना घरीच अलगिकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला. 13 जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटीत पाठवले. काल आणि आजचे मिळून 28 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. तर काल(मंगळवारी) रात्री उशिरा 17 वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.म्हणून आता एकूण 20 कोरोनाबाधित रुग्णांवर मिनी घाटीत उपचार सुरू आहेत. तसेच 64 जणांना देखरेखीखाली रुग्णालयात ठेवल्याचेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.

दरम्यान,औरगाबाद शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणावर मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर औरंगाबाद महापालिकेची कारवाई सतत सुरू असून आज सलग दुसऱ्या दिवशी एकूण 85 नागरिकांवर कारवाई करून 43500 रुपय दंड आकारण्यात आले. सदरील कारवाई मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडये यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या निगराणीत नागरिक मित्र पथक चे कर्मचारी आणि वॉर्ड अधिकारी यांच्या समन्वयाने 09 प्रभागात पार पाडण्यात आली. काल देखील या प्रकारची कारवाईत 92 विना मास्क लावून फिरणारे नागरिकांकडून 46,000 रुपये दंड वसूल करण्यात आला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!