Share

सरपंच निवडीपूर्वी सहलीवर गेलेल्या ग्रा.पं. सदस्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक

Published On: 

औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींच्या सरपंच तसेच उपसरपंचपदांसाठी सोमवारी (दि. 8 रोजी निवडी) होणार आहे. तथापि, सहलीवर गेलेल्या सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवारी सकाळी दहा वाजेपासून तालुक्यातील सरपंच-उपसरपंचांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. गंगापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निकालात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. बहुमताअभावी अनेक ठिकाणी अस्पष्ट स्थिती आहे.

सदस्यांची पळवापळवी होऊ नये म्हणून खबरदारी घेत अनेक गावांतील निर्वाचित सदस्यांना त्यांच्या पॅनलने सहलीवर पाठवले आहे. तथापि, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या सहलीवर गेलेल्या सदस्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानंतर त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. एखादा सदस्य पॉझिटिव्ह आढळला तर त्याचे मतदान अखेरीस पीपीई किट घालून घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!