Share

‘कोरोना’मुळे ग्रामीण जीवन जवळून बघण्याचा योग आला : पंडितराव धुमाळ

Published On: 

🕒 1 min read

प्रदीप मुरमे  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन झाल्यामुळे आपण आपल्या कुटूंबासोबत शेडोळ (ता.निलंगा) या जन्मभूमी असलेल्या आपल्या छोट्याशा खेडेगावी राहण्यास आल्यामुळे ब-याच वर्षानंतर आपल्याला ग्रामीण जीवन जवळून बघण्याचा व बालमित्रांशी गप्पागोष्टी करण्याचा योग आल्याचे लातूर जि.प.माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले.

शिक्षणाच्या निमित्ताने ८ वी ला १९७५ मध्ये गाव सोडले.त्यानंतर नोकरीमुळे १९८९ मध्ये मुंबईला स्थायिक झालो.परिणामी शेडोळला मुक्कामी राहण्याचा योग फार क्वचितच आला.वेळाआमावस्या व कुटूंबातील लग्न कार्यासारखा एखादा कार्यक्रम अशा प्रसंगीच एखादा दुसरा मुक्काम गावी असायचा. नोकरीच्या निमित्ताने मुंबईला स्वतःच्या रो- हाऊसमध्ये वास्तव्य आहे.मागील ३०-३१ वर्षापासून तेथे राहत असल्यामुळे मुंबईच्या त्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनशैलीशी कधी एकरुप झालो हे मला देखील उमगले नाही.त्यामुळे दरम्यानच्या काळात गावाकडील संपर्क तसा फारच कमी झाला होता.

बालपण जरी शेडोळ व आजोळी राठोड्यात गेले असले तरी मागील अनेक वर्षापासून मुंबईत राहत असल्यामुळे ग्रामीण जीवन पुरते विसरुन गेलो होतो.दरम्यान २००७ मध्ये जि.प.निवडणूकीच्या माध्यमातून राजकारणात ओढलो गेलो.सुदैवाने जि.प.सदस्य म्हणून निवडून येताच उपाध्यक्ष झालो.त्यानंतर लागलीच अध्यक्ष म्हणून काम करण्याचे भाग्य लाभले.

राजकारणाच्या निमित्ताने गावाकडे आलो असलो तरी वास्तव्य हे निलंगा व मुंबईलाच.परंतु कोरोनामुळे मात्र मागील २० दिवसापासून कुटूंबासह शेडोळला मुक्कामी ठाण मांडून असल्यामुळे ब-याच वर्षानंतर अस्सल ग्रामीण जीवन जवळून बघता आले व अनुभवता आले .एवढेच नव्हे तर अनेक बालमित्रांशी हितगुज साधता आल्याचे धुमाळ यांनी सांगितले.ग्रामीण जीवनशैली तणावमुक्त असून गावचे लोक समाधानी आहेत.

गावातील वातावरण आल्हाददायक आहे.तथापि वीज,पाणी अशा काही मूलभूत समस्या देखील ग्रामस्थांना भेडसावताना दिसतात.आपला वाडा हवेशीर मळ्यात असल्यामुळे मुंबईत राहिलेल्या माझ्या सारख्यासाठी हा आगळा वेगळा अनुभव निश्चितच अत्यंत सुखद आहे.सकाळी योगा करणे,नातवांशी खेळणे, मळ्यात थोडा फेरफटका मारणे,दुपारी थोडेसे आराम करणे,रस्त्यावरुन येणा-या जाणा-या ग्रामस्थांशी संवाद साधणे,बातम्या ऐकणे, संध्याकाळी बालमित्रांशी सोशल डिस्टनसिंग पाळून गप्पा मारणे व कुटूंबाला वेळ देणे असा आपला या  लॉक डाऊनमधील दिनक्रम आहे.

त्यामुळे दिवस कधी संपतो हे अजिबात लक्षात देखील येत नसल्याचे धुमाळ यांनी बोलून दाखविले. लॉक डाऊन हाच कोरोनावर प्रभावी उपाय असल्यामुळे आपण सर्वजण लॉक डाऊन काटेकोरपणे पाळू या असे आवाहन जि.प.माजी अध्यक्ष धुमाळ यांनी यावेळी बोलताना केले.

हेही पहा –

https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!