Share

Corona Update : मुंबईतसह उपनगरात कोरोना सक्रीय, तर पुण्यातील रुग्णांच्या संख्येत वाढ

Published On: 

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याच दिसत आहे. कारण गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांचा आकडा 2916वर गेला आहे. तर मृतांचा आकडाही वाढत आहे. तसेच देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 12380वर गेला असून आतापर्यंत 414 जणांचा   मृत्यू झाला आहे.

राज्यातील मुंबई – पुणे या दोन प्रमुख शहरांमध्ये कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. तर  बुधवारी तब्बल 55 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने पुणे जिल्ह्यात एकूण 437 रुग्ण झाले आहेत. कालच्या दिवसात पुण्यात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा 43 झाला आहे. भवानी पेठेत आतापर्यंत एकूण 96 रुग्ण सापडले आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चौघांना कोरोनाची लागण झालेली आहे. यात चार वर्षीय चिमुरडी, तिची आई, अन्य एक महिला आणि पुरुष अशा चौघांचा समावेश आहे. हे सर्व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे शहराचा आकडा हा 48 वर जाऊन पोहचला आहे

तसेच मुंबईतील धरावी परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. बुधवारी मुंबईत 140 नवीन प्रकरणे नोंदली गेली.  तर 2 जणांना आपले      प्राण गमवावे लागले. तर मुंबईतील रूग्णांची संख्या 1936 वर पोहोचली आहे.

जगात अमेरिकेमध्ये सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण मृत्युमुखी पडत आहे. अमेरिकेत सध्या 6 लाख 44 हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 28,554जणांचा मृत्यू   झाला आहे. जगात एकूण 20 लाख 84 जहर 042 एवढीजण कोरोनाबाधित आहेत.

…अस झालं तर उद्धव ठाकरेंना द्यावा लागणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!