Share

Weight Loss Tips | वजन कमी करण्यासाठी ‘या’ फळांचा ज्युसचे करा सेवन

Published On: 

🕒 1 min read

Weight Loss Tips | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वजन (Weight) वाढणे ही खूप गंभीर समस्या झाली आहे. लठ्ठपणामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतात. वाढत्या वजनामुळे अनेकांच्या दैनंदिन कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्याचबरोबर लठ्ठपणा वाढल्याने डायबिटीज, हृदयविकार आणि थायराइड सारखे आजार होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच प्रत्येकजण वजन नियंत्रणात ठेवून, तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करत असतो. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करतात. त्याचबरोबर आहारातही बदल करतात. तरी काही केल्या वजन नियंत्रणात राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काही फळांच्या ज्यूसचे सेवन करू शकतात. या फळांच्या ज्यूसचे सेवन केल्याने तुमचे वजन नियंत्रण राहू शकते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही पुढील फळांच्या ज्यूसचा तुमच्या आहारात समावेश करू शकतात.

डाळिंब ज्यूस

डाळिंबाच्या ज्यूसचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कारण डाळिंबाच्या ज्यूसमध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे अँटी अँक्सीडेंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे नियमित डाळिंबाच्या ज्यूसचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे त्याच्या सेवनाने अतिरिक्त चरबी वाढत नाही. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाच्या रसाचे सेवन करू शकतात.

संत्रा ज्यूस

संत्र्याच्या ज्यूसमध्ये अनेक पोषक गुणधर्म आढळतात. यामध्ये विटामिन सी, अँटी अँक्सीडेंट यांचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करायचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात संत्र्याचा ज्यूसचा समावेश करू शकतात. संत्र्याच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते.

ॲपल ज्यूस

ॲपल ज्यूसमध्ये माफक प्रमाणात फायबर उपलब्ध असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सफरचंदाच्या ज्यूसचे सेवन फायदेशीर ठरू शकते. सफरचंदाचा ज्यूस प्यायल्याने पोट बराच वेळ भरलेले असते. त्यामुळे तुमचे अतिरिक्त खाणे टाळू शकते. सकाळी रिकाम्या पोटी ॲपल ज्यूसचे सेवन केल्याने पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!