टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कॉंग्रेसची मुंबईत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते.
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेसला दारूण पराभव स्वीकारावा लागला आहे. राज्यात कॉंग्रेसला १ जागा मिळाली आहे. तर कॉंग्रेस आघाडीला मिळून ६ जागा मिळाल्या आहेत. आणि आता आगामी विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणुकी सारखा पराभव स्व्विकारावा लागू नये म्हणून जोरात आयरि सुरु केली आहे. याचदरम्यान, राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने सर्व पक्षांच्या नेत्यांनी दुष्काळी दौरेही केले आहेत. याचदरम्यान आगामी विधानसभा निवडणूकचा आढावा घेण्यासाठी कॉंग्रेसने टिळक भवन मुंबई येथे आढावा बैठक घेतली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी @kharge ,महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष @AshokChavanINC यांच्या प्रमुख उपस्थितीत आज टिळक भवन मुंबई येथे बैठक पार पडली. pic.twitter.com/7arKWMKWQS
— Harshvarrdhan Patil (@Harshvardhanji) June 13, 2019
कॉंग्रेसच्या या बैठकीत राज्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्याती जिल्ह्यांचा विधानसभा मतदार संघ निहाय आढावा घेण्यात आला. यावेळी, मल्लिकार्जुन खरगे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, हर्षवर्धन पाटील तसेच अन्य नेते उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

