Share

कॉंग्रेसचा विलास लांडेंना पाठींबा नाही

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचा सामना राष्ट्रवादी पुरस्कृत विलास लांडे यांच्याशी होत आहे. विलास लांडे यांना राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याने कॉंग्रेसही त्यांना पाठींबा देणार असल्याचं बोलले जात आहे.

याविषयी भाष्य करताना कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी कॉंग्रेसने विलास लांडे यांना अजून अधिकृतरित्या पाठींबा दिलेला नाही. परंतु विलास लांडे यांनी पाठींबा द्यावा यासाठी पत्र लिहिले आहे. त्यांना पाठींबा द्यायचा की नाही याविषयी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलणे सुरु आहे अशी माहिती दिले.

तसेच पुढे बोलताना साठे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत लांडे यांना पाठींबा द्यायचा की नाही याविषयी भूमिका जाहीर करू अशी माहिती दिली आहे. दरम्यान, भोसरी मतदारसंघातून २०१४ ला महेश लांडगे हे विजयी झाले होते. आणी आता त्यांचा सामना विलास लांडे यांच्याशी होत आहे. जर कॉंग्रेसने लांडे यांना पाठींबा दिला तर महेश लांडगे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183268018656178176?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183266308856504320?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183256491840561154?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!