नवी दिल्ली : ‘केंद्र सरकारनं बेरोजगारी कमी करण्यासाठी काही उपाययोजना करायला हव्या. तसंच गरीबांना तातडीनं आर्थिक मदत द्यायला हवी. याव्यतिरिक्त राज्यांच्या सर्व गरजा केंद्र सरकानं पूर्ण करायला हव्या. केंद्र सरकारनं जीएसटीची रक्कमही सर्व राज्य सरकारांना द्यावी,’ असं मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.
राहुल गांधी यांनी आज सोशल मीडियाद्वारे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना गांधी म्हणाले, ‘जोपर्यंत लॉकडाउन आहे तोवर करोनाचा व्हायरस थांबेल. परंतु जेव्हा पुन्हा लॉकडाउन संपेल तेव्हा हा करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा जाणवू लागेल’.
तसेच पुढे ते म्हणाले, ‘लॉकडाउन हा केवळ हा पॉझ बटनाप्रमाणे आहे. करोनाला हरवण्यासाठी केवळ लॉकडाउन पुरेसं नाही, असं स्पष्ट मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
दरम्यान, करोनामुळे देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात सध्या बेरोजगारीही वाढू लागली आहे. येत्या काळात देशात खाद्यान्नाचीही कमतरता भासेल, सध्या जे अन्नधान्य साठवण्यात आलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचंही गांधी म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

